Ad will apear here
Next
दादी, तुझे सलाम!
सैनिकी शाळेत जाणाऱ्या नातवाचे शूज खराब होऊ नयेत म्हणून त्याला खांद्यावरून घेऊन जाणाऱ्या चंद्रभागा वगरे.पंढरपूर : ‘शिवाजी जन्मावा, पण तो शेजारच्या घरात’ ही वृत्ती सर्वसाधारणपणे समाजात दिसते. हाच विचार लष्करातील नोकरीबाबतही अनेकदा दिसतो. पंढरपूर तालुक्यातील पांढरेवाडी येथील एक आजीबाई मात्र या गोष्टीला अपवाद ठरल्या आहेत. त्यांनी आपल्या नातवाला लष्करात पाठवण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. आणि नुसते स्वप्न पाहून त्या थांबलेल्या नाहीत, तर त्याला सैनिकी शाळेत पाठवून त्याची तयारी करून घेण्यासाठी त्या स्वतः कष्ट करत आहेत. 

टीव्ही किंवा चित्रपटातील वाटेल असेच काहीसे दृश्य अनेकदा पांढरेवाडी ग्रामस्थांना पाहायला मिळते. तसेच ते दोन दिवसांपूर्वीही पाहायला मिळाले. पावसाने सर्वत्र दलदल झाली होती. सकाळची वेळ असल्याने घराघरांत कामाची गडबड.... जनावरांच्या धारा काढण्याची घाई... मुलांना शाळेत पाठवण्याची गडबड... शेतकऱ्यांची न्याहरी चाललेली... सगळे आपापल्या कामात व्यग्र होते. अशातच चंद्रभागा वगरे नावाच्या आजीबाई आपला नातू रोहन याला खांद्यावर घेऊन निघाल्या होत्या. 

रोहन सध्या पहिलीच्या वर्गात शिकतो आहे. शाळेची एकही पायरी न चढलेल्या या आजीबाईंनी आपला नातू सैन्यात भरती होईल, असे स्वप्न पाहिले आहे. त्यासाठी त्यांनी रोहनला सैनिकी शाळेतच पाठवण्याचा हट्ट घरच्या लोकांकडे धरला. त्यांचा तो हट्ट सर्वांनी मान्य केला. आणि तिथपासून त्यांची स्वतःचीही परीक्षा सुरू झाली. 

त्या रोहनला वेळेत शाळेत सोडतात. तो घरी आल्यावर अभ्यासाला बसवतात. शाळेत दिल्या जाणाऱ्या भरतीपूर्व प्रशिक्षणाचा सराव घरी करून घेतात. त्यांचे कुटुंब शेती करणारे आहे. त्यामुळे त्यांचे वास्तव्य शेतातच असते. सध्या पावसाळ्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर चिखल व पाणी साठल्यामुळे या आजीबाई रोहनचे शूज खराब होऊ नयेत म्हणून एका हातात त्याचे दप्तर घेऊन, त्याला पक्क्या रस्त्यापर्यंत चक्क खांद्यावरून घेऊन जातात. उद्या आपला नातू आपले स्वप्न पूर्ण करील, अशी त्यांना आशा आहे. खेडेगावातील अशा या देशभक्त चंद्रभागा आजीला सॅल्यूट करायला हवा.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZZDBG
Similar Posts
‘पाऊस न्हाय म्हणून शेतीची कामे थांबवायची का?’ सोलापूर : ‘पावसाचा अजून पत्ताच न्हाय... आत्ता जरी पाऊस पडला, तरी पेरणी करताच येत न्हाय...आकाड सरला की लगीच सरावन लागतूय...अणं सरावनात, तर बैल पोळ्याला ज्वारीची पेरणी करावी लागतीय... यंदाचा ही हंगाम वायाच गेला बघा... पाऊस काशाचा नुसत वारच भकाय लागलय...! आज उद्या पाऊस पडलच की पाऊस न्हाय म्हणून शेतीची
मृगाच्या आनंदसरी!!! पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात रविवारपासून (११ जून) मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांसह शहरी नागरिकही सुखावले आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या सरकारच्या घोषणेनंतर लगेच निसर्गाने साथ दिल्यामुळे शेतकरी आनंदले आहेत. प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या शहरी नागरिकांनीही सुटकेचा निःश्वास टाकला आहे
साडेतीन हजार पुस्तके भेट देणारा माणूस पंढरपूर : सावळ्या विठूरायाच्या पंढरीत विठूरायाच्या भक्तीने वेडी झालेली अनेक माणसे येत असतात. असाच एक वेडा माणूस पंढरपुरात आहे; पण त्याचे वेड जरा वेगळे आहे. ते वेड आहे लोकांना पुस्तके भेट देण्याचे. आजपर्यंत विविध प्रसंगांच्या निमित्ताने या माणसाने जवळपास साडेतीन ते चार हजार पुस्तके लोकांना भेट दिली आहेत
‘गाळ्यांच्या ई-लिलावाची प्रक्रिया लवकरच सुरू’ सोलापूर : ‘शासनाच्या सूचनेनुसारच सोलापूर महापालिकेच्या सर्व गाळ्यांची लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून, पाणीपुरवठा विभागाकडून नळ जोडणीच्या ठिकाणी लवकरच स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहे,’ अशी माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language